वैशिष्ट्यीकृत

महाबळेश्वर शहराची निर्मिती कशी झाली? संपूर्ण इतिहास भाग १

महाबळेश्वर शहराच्या निर्मितीस सुरुवात 

छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि राजमार्गाचा इतिहास

छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी सन 1818 मध्ये राज्य ताब्यात घेतल्यानंतर राज्याची घडी नीट बसवली. त्यानंतर दिनांक 24 एप्रिल 1823 रोजी त्यांनी प्रतापगडावर जाऊन आई भवानीचे दर्शन घेतले यावेळी साताराहून प्रतापगडी जाण्याचे दोनच मार्ग होते एक मार्ग म्हणजे राजमार्ग जो की यवतेश्वर- एकीव- सांगवी मुरा- गाळदेव -धारदेव मोळेश्वर मार्गे महाबळेश्वर येथून पार घाट किंवा अनिसणीच्या वाटेने प्रतापगड तर दुसरा मार्ग म्हणजे सातारा वाई पसरणी पुढे डोंगर चढून पाचगणी आणि महाबळेश्वर येथून पार घाटात जाऊन निसरणी डोंगराने प्रतापगड असे हे दोन मार्ग अवलंबले जात होते.

छत्रपती प्रतापसिंह महाराज

डेराचा माळ: छत्रपतींचा मुक्काम आणि हुजूर बाजार

छत्रपती प्रतापसिंह महाराज राजमार्गाने महाबळेश्वरास गेले त्यांचा तळ पडला तो क्षेत्र महाबळेश्वर पासून अलीकडे चार किलोमीटर असलेल्या डेराच्या माळ्यावरती या जंगली परिसरातील एकमेव मोकळे मैदान म्हणजे डेराचा माळ या संपूर्ण भागात निर्भीड अरण्य आहे जिथे एक दिवसादेखील सूर्यनारायणाचे दर्शन होणार नाही इतके घनदाट जंगल आहे तिथेही अशी एकमेव जागा होती जिथे यंदाचे 17 लाख चौरस मीटर मोकळे मैदान होते आपल्या फौजीचा डेरा किंवा तळ टाकण्यास अत्यंत उपयुक्त अशी ही जागा होती. 

या भागातून प्रतापगड अथवा क्षेत्र महाबळेश्वर जाण्याचा एक वेग मार्ग येथून असल्यामुळे तसेच याच माळाच्या शेजारून वेंना नदी वाहत असल्यामुळे येथे डेरा किंवा मुक्काम करण्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती त्यामुळे या सडेराचा माळ म्हणत हेच छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा डेरा पडला होता ढेऱ्याची भव्यता इतकी मोठी होती ती एक शहर वसल्याचा भास होईल जेव्हा येथे डेरा पडे तेव्हा येथे आसपासचे लोक येऊन दुकाने थाटत त्यामुळे त्यास पूर्वी हुजूर बाजार म्हणत.

रात्री मुक्काम करुन छत्रपती प्रतापसिंह महाराज भल्या पहाटे आई भवानीच्या दर्शनास प्रतापगडी गेले. त्यानंतर पुन्हा आल्या नंतर क्षेत्र महाबळेश्वरास दर्शनास गेले आणि पुन्हा साताऱ्यात आले. प्रतिवर्षी महाराज देवीच्या दर्शनास जात. मार्च १८२४ मध्ये महाराज सहकुटूब आई भवानीच्या दर्शनास प्रतापगडी गेले. या वेळी त्याच्या सोबत जवळपास दोन हजार लोकांचा लवाजमा होता.

कर्नल लॉडविकची महाबळेश्वर भेट 

काही दिवस प्रतापगडावर राहून महाराज पुन्हा साताऱ्यास आले. या वेळी प्रथेप्रमाणे साताऱ्याचा रेसिडेंट कर्नल ब्रिग्ज हा महाराजांची विचारपूस करण्यासाठी राजवाड्यात आला. ख्यालीखुशाली विचारल्यानंतर त्याने महाराजांना प्रवासाबाबत विचारले. महाराजांनी त्या भागाविषयी विस्तृत वर्णन सांगितले. ते वर्णन ऐकून ब्रिग्ज अतिशय खुश झाला. त्या जागेविषयी त्यास कुतूहल निर्माण झाले. मुळातच ब्रिटीश लोकांना थंड हवेच्या ठिकांणाविषयी विशेष आकर्षण असते. त्यामुळे त्याने लगेचच आपला एक अधिकारी लेप्टनंट कर्नल लॉडविक यास महाबळेश्वरास पाठविले. 

तेथील भागाची पाहणी करुन त्या विषयी एक अहवाल बनविण्यास सांगितले. त्यानुसार लॉडविक त्याच महिन्यात महाबळेश्वरास गेला. असे सांगितले जाते की  या भागात येणारा लॉडविक हा पहिला यरोपियन व्यक्ती. पण ते साफ चुकीचे आहे त्याच्याही 33 वर्ष आधी सवाई माधवराव पेशव्यांसोबत आलेला सर चार्ल्स मॅलेट हा या भागात भेट देणारा पहिला यरोपियन व्यक्ती ठरतो. 

साताऱ्यातील उन्हाळा लॉडविकला मानवत नव्हता. त्यामुळेच त्याने महाबळेश्वर भागात जाण्याचे ठरविले. त्यानुसार १ एप्रिल १८२४ रोजी महाबळेश्वरास गेला, तो कोणत्या मार्गाने गेला या बाबत ठोस माहिती आढळत नाही. पण त्या बाबतीत एक प्रचलित कथा सांगितली जाते. ती अशी आहे की लॉडविक हा सिडने पॉईंट म्हणजेच सध्याचा लॉडविक चढून वर आला व तेथे काही दिवस मुक्काम केला.

या मुक्कामात त्याच्या समोरुन त्याचा आवडता कुत्रा वाघाने पळवून नेला. या घटनेस खरे मानावे तर लॉडविकने बॉम्बे  कुरियरला लिहलेल्या पत्रात तो म्हणतो की येथे वाघांना किंवा चोरांना घाबरण्याचे कारण नाही कारण आम्ही या पैकी काहीच आमच्या येथील मुक्कामात पाहिले नाही. त्यामुळे असे काही घडले असेल असे वाटत नाही.

साताऱ्यास परत आल्यानंतर लॉडविकने आपला अहवाल कर्नल ब्रिग्जला सुपूर्त केला. पण पुढे काही हालचाली होण्याच्या आधीच दर्दैवाने लॉडविक यास आपल्या फौजेनिशी कर्नाटकातील कित्तूर येथे काहीतरी गडबड झाल्या कारणाने तेथे जाण्यास सांगण्यात आले. लॉडविकने जून १८२४ मध्ये सातारा सोडला. त्या नंतर तो थेट आठ वर्षानेच साताऱ्याचा रेसिडेंट म्हणून १८३२ मध्ये पुन्हा साताऱ्यास आला.

लॉडविकने बॉम्बे कुरियरला लिहलेले पत्र प्रकाशित होताच त्याचा मोठा परिणाम झाला. रेवरंड हॉल यानी लगेचच महाबळेश्वरास भेट दिली. त्याने आपल्या प्रवास वर्णनात या भागाची वर्णने लिहली आहेत.

हवामानाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत मनमोहक आहे आणि पश्चिमेकडील संभाव्य (जिथे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या वतीने शहर वसवले जाणार होते) जागा तर अतिशय सुंदर आहे. घनदाट परिसर नजरेस पडतो." या नंतर त्याने क्षेत्र महाबळेश्वरास ही भेट दिली.

कर्नल ब्रिग्जचा अहवाल आणि एल्फिन्स्टनची योजना

काही महिन्यांनी कर्नल ब्रिग्जने स्वतः या भागास भेट देण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने सन १८२५ मध्ये या भागास भेट दिली. जवळपास दोन महिने तो या भागात राहिला. या दोन महिन्यात त्याने संपूर्ण परिसर पालथा घातला. त्याने प्रतापगड आणि क्षेत्र महाबळेश्वरासही भेट दिली. त्यानंतर तो साताऱ्यास परत आला. पण त्या दोन महिन्यात त्याने केलेल्या पाहणीचा तेथील संपूर्ण परिसराविषयी, हवे विषयी, वातावरणाविषयी, तेथील झाडे वनस्पती याविषयी अभ्यासपूर्ण अहवाल बनविला. तो अहवाल त्याने तत्कालीन गव्हर्नर एल्फिन्स्टन यास सादर केला. या अहवालावरुन हे स्पष्ट होते की त्याची त्या भागात मुंबई प्रेसिडेन्सीसाठी सॅनिटेरियम सुरू करण्याची कल्पना होती. 

कर्नल ब्रिग्ज
कर्नल ब्रिग्ज 

इकडे त्याने साताऱ्यास प्रतापसिह महाराजांना आपली संकल्पना सांगितली. हा  प्रांत प्रतापसिह महाराजांनी आपली संकल्पना सांगितली. हा प्रांत  प्रतापसिंह महाराजांच्या अथेरित येत असल्याने त्यांनी त्यांची परवानगी मागून सहकार्य करण्याविषयी विनंती केली सोबतच राजमार्ग आणि वाई पसरणी मार्गे जाणारा रस्ता दुर्गम असल्याने एखादा नवीन रस्ता तयार करण्याविषयी महाराज विनंती केली तसेच पारगाव दुरुस्त करावा याविषयी कळविले प्रतापसिंह महाराजांना ही संकल्पना आवडली आणि त्यांनी सहकार्य करायचे आश्वासन दिले कर्नल ब्रिग्ज सोबत झालेल्या या चर्चेची नोंद प्रतापसिंह महाराजांनी करून ठेवली आहे.

पावसाचे दिवस असल्याने काही हालचाल होऊ शकली नाही राज्यात अनेक ठिकाणी दौरे सुरू असल्याने महाराज त्यात गुंतून पडले होते याच काळात प्रतापसिंह महाराजांनी शाळा सुरू केल्या होत्या छापखाना ही सुरू केला होता अनेक धाडसी निर्णय घेण्याचा धडाका महाराजांनी लावला होता त्याच दरम्यान सातारा ते पुणे सातारा ते पंढरपूर असे रस्ते जातीने बनवून घेतले होते त्यास येणार खर्च देखील स्वतः करीत होते दरम्यान मुंबई प्रांताचा गव्हर्नर एलफिस्टंट याच्यासोबत पुढील करार आणि महत्त्वाच्या निर्णयान संबंधी बैठक ठरली होती. 

पूर्वी नियोजन जेजुरी दर्शनात जायचे ठरले असल्यामुळे बैठक जेजुरीच आयोजित करण्यात आली होती त्यानुसार एप्रिल 1826 मध्ये महाराज जेजुरीस गेले पण इकडे कर्नल ब्रिग्ज मात्र ध्येयाने झपाटलेला होता जेजुरी वरून पुन्हा महाराज साताऱ्यास आल्यानंतर त्याने महाराजांची भेट घेऊन प्रास्ताविक काम विषय आठवण करून दिली. महाराजांनी ही लगेच नवीन रस्ता बनविण्याच्या कामास पैसे मंजूर केले तसेच जवळपास 800 मजूर प्रति महिना चार रुपये पगाराने रस्त्याच्या कामे लावले. यावेळी खुद्द महाराजांनी सर्व कामात लक्ष घातल्यामुळे कामाचा वेग वाढला.

वेण्णा लेकची निर्मिती आणि नवीन रस्त्याचे काम

दरम्यान महाराजांनी ब्रिग्ज एकत्रित महाबळेश्वरला भेट देण्यास गेले सर्व भागाची पाहणी आपले अधिकारी व ब्रिटिश इंजिनियर सोबत करून अनेक गोष्टी ठरविण्यात आल्या त्यात प्रथम प्रतापसिंह महाराजांनी आपला डेरा जिथे पडत असे त्या डेऱ्याच्या माळावर स्वतःसाठी प्रशस्त राजवाडा बांधण्याचे निश्चित केले त्यासाठी प्रथम एक विहीर तेथे खोदली तसेच वेण्णा नदीवर बांध घालण्यासाठी खाजगीतून पाच हजार रुपये मंजूर केले हेच सध्याचे वेण्णा लेक हे सर्व काम महाराजांचे बांधकाम खात्याचे प्रमुख राणूजी नाईक यांना सुपूर्त करण्यात आले होते.

कर्नल ब्रिग्जने देखील स्वतःसाठी एक छोटेखाने बंगला बांधला तो पूर्णपणे लाकूड आणि माती पासून बनवलेला होता त्याचे काम वेगाने करण्यात आले छोटेखाने असल्यामुळे त्याच वर्षी तो बांधून पूर्ण देखील झाला त्यानंतर तो तेथे सहकुटुंब राहण्यास केला त्यानंतर बराच काळ मुंबई प्रांताचा गव्हर्नर एलफिस्टनच्या मागे सॅनिटरीयम सुरू करण्यासाठी त्याने तगादा लावला.

नंतर एलफिस्टनने मेडिकल बोर्ड आपला अहवाल सादर करून आपली मागणी कळविण्यासंदर्भात ब्रिग्जने सांगितले त्यानुसार कर्नल ब्रिग्ज 1826 मध्येच मेडिकल बोर्ड अत्यंत विस्तृत अहवाल सादर केला त्या अहवालात त्याने त्या भागाविषयी विस्तृत माहिती नमूद केली आहे. हा अहवाल बराच काळ विचाराधीन राहिला त्यावर लवकरच कार्यवाही झाली नाही.

महाबळेश्वरचे खरे संस्थापक

खरं तर ब्रिग्जने प्रतापसिंह महाराजांसोबत खांद्याला खांदा लावून महाबळेश्वरच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्याची तब्येत त्यास साथ देत नव्हती तरीही या कामी तो झपाटून काम करीत होता प्रतापसिंह महाराज आणि ब्रिग्ज यांचे नाव महाबळेश्वरच्या जडणघडणीस सर्वात वरती घेतले जाणे गरजेचे आहे पण दुर्दैवाने फक्त लॉर्ड वीक एलफिस्टन आणि मालकमी यांचीच नावे पुढे केली जातात पण महाबळेश्वरचे संस्थापक प्रतापसिंह महाराज आणि कर्नल ब्रिग्ज यांनाच म्हणावे लागेल.

 दुर्दैवाने 1826 मध्ये कर्नल ब्रिग्जला सातारा सोडावा लागला आणि 18 जानेवारी 1827 मध्ये इंग्लंडला परत गेला कर्नल ब्रिग्ज सोबत जास्त जवळीक महाराजांची झाली होती त्यांच्या जाण्याने प्रतापसिंह महाराजांनी एक अत्यंत जवळचा मित्र गमावला खरंतर प्रतापसिंह महाराजांनी सातारा रेसिडेंट साठी महाबळेश्वर येथे बंगला बांधण्यास घेतला होता तोच शिंदोळा पार्क हा बंगला कर्नल ब्रिग्ज लंडनला जाईपर्यंत त्याचे बांधकाम पूर्ण झाले नव्हते.


तुम्हाला हा इतिहास कसा वाटला?

छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि कर्नल ब्रिग्ज यांनी महाबळेश्वर शहराच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे खाली Comment करून नक्की सांगा. ही ऐतिहासिक माहिती तुमच्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा!

 पुढील भागात काय वाचाल?

महाबळेश्वरचे नाव 'मालकमपेठ' कसे पडले? गव्हर्नर सर जॉन मालकमची महाबळेश्वर भेट आणि त्यानंतर शहरात झालेला कायापालट याबद्दलची रंजक माहिती 'महाबळेश्वर शहराची निर्मिती - भाग २' मध्ये लवकरच वाचा!