ओळख महाबळेश्वरची

   महाबळेश्वर नुसते नाव जरी घेतले तरी आपल्याला आठवतो तो उत्तुंग सह्याद्री गुलाबी थंडी गर्द आणि निर्भीड अरण्य येथे एकदा आल्यानंतर पावले लवकर माघारी वळत नाही इतके मनमोकळे वातावरण माणसाच्या आयुष्यातला सर्वात रम्य काळ असतो तो म्हणजे बालपण माझे नशीब इतके थोर की माझे संपूर्ण बालपण शालेय शिक्षण महाबळेश्वर मध्ये झाले येथील रस्त्यांवर जंगलातून फिरत व्यतीत झालेला तो काळ आजही डोळ्यांसमोर ताजा आहे.

महाबळेश्वर निसर्गाला  पडलेले अत्यंत सुंदर तितकेच रांगडे स्वप्न. महाबळेश्वर म्हणजे निर्भीड अरण्य. जिथे दिवसाही एकटे भटकायला भीती वाटावी जिथे माहीतगारा शिवाय फिरणे म्हणजे निव्वळ अशक्य अशा दाट जंगलातून जाणाऱ्या नागमोडी घाटवाटा महाबळेश्वर हे उत्तर अक्षांश 17.59 व पूर्व रेखांश 73.30 यांचे दरम्यान सह्याद्रीच्या मुकुटावर विराजमान आहे. महाबळेश्वर सध्या दोन भागात मोडले जाते एक म्हणजे शेत्र महाबळेश्वर दुसरे म्हणजे महाबळेश्वर शहर महाबळेश्वरचे मूळ नाव नहर होते. नहर म्हणजे थंड हवेचे ठिकाण. पूर्वी येथे आसपास असलेल्या अनेक वस्त्यांवर हेच नाव रूढ होते. येथे पूर्वी धनगर आणि कोळी लोकांची जवळपास दहा वीस घरे होती. आज महाबळेश्वर हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असले तरी हे शहर पूर्वी असून अस्तित्वात नव्हते.

श्रीमंत छत्रपती राजश्री शाहू महाराज


              या पर्यटन स्थळाची स्थापना अगदी नियोजनबद्ध रित्या ब्रिटिशांकडून नव्हे तर मराठा साम्राज्याच्या छत्रपतींकडून करण्यात आली होती. कालांतराने हे शहर ब्रिटिशांच्या हाती गेले अर्थात शहराच्या विकासात ब्रिटिशांचे योगदान नाकारता येत नाही शहराचा विकास जरी ब्रिटिशांनी केला असला तरी याची स्थापना मात्र छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी केली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आणि ब्रिटिशांनी या भागाचा चौफेर विकास करत त्या काळातील महाराष्ट्रातील पहिले गिरिस्थान शहर उदयास आणले शहरास वर्षकाठी लाखो पर्यटक भेट देत असतात येथील पर्यटनाचा आस्वाद घेत असतात उन्हाळ्यात तर शहर अगदी ओसंडून वाहत असते पण स्थापना झाल्यानंतर ही संख्या दोन आकडी पण नव्हती हे जर सांगितले तर आश्चर्य वाटेल.

            सातारा छत्रपतींकडून दोन शहरे स्थापन करण्यात आली एक म्हणजे राजधानी सातारा शहर आणि दुसरे म्हणजे पर्यटन स्थळ महाबळेश्वर शहर सातारा शहराची स्थापना छत्रपती शाहू महाराजांनी सण 1720 मध्ये केली तर महाबळेश्वर शहराची स्थापना सन 1826 मध्ये शाहू महाराजांचे पणतू छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी केली सातारकर छत्रपती किती विकासक दृष्टीने कार्य करत होते हेच एकंदरीत या सर्वांवरून आपल्याला दिसून येते छत्रपती शाहू महाराजांनी सातारा शहर नियोजनबद्ध रित्या वसवले त्याच धर्तीवर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी महाबळेश्वर शहर वसवले हेच शहर पुढे जाऊन भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आजच्या घडीला लाखो पर्यटक या शहरास भेट देतात पण हे शहर काही सहजासहजी इतके प्रसिद्ध पावले नाही यामागे कित्येक व्यक्तींचे कष्ट आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे या शहराच्या हृदयात अनेक गुढ कथा आजही तशाच आहेत त्याचाच मागोवा आपण या वेबसाईट वरती घेणार आहे.

  महाबळेश्वर मधील संख्या ऐतिहासिक गोष्टींचा उघडा पण या पोस्टद्वारे करणार आहे महाबळेश्वर शहराची स्थापना कधी झाली? कोणी केली तसेच ब्रिटिशांचे योगदान काय होते महाबळेश्वरमध्ये त्याचबरोबर अनेक पॉईंट कसे उदयास आले त्याचप्रमाणे महाबळेश्वर मध्ये असलेले असंख्य विलुप्त झालेले पॉईंट्स आणि नवीन उदयास आलेले पॉईंट्स आणि असंख्य गोष्टींचा पण उलगडा या वेबसाईटच्या माध्यमातून करणार आहे

टिप्पण्या