हा ब्लॉग शोधा
महाबळेश्वरमधील सर्वोत्तम पॉईंट्स, हॉटेल्स आणि टॅक्सी प्रवासाची संपूर्ण माहिती देणारा ब्लॉग
वैशिष्ट्यीकृत
क्षेत्र महाबळेश्वरमधील प्रमुख मंदिरे
क्षेत्र महाबळेश्वरमधील प्रमुख मंदिरे
हिंदू धर्मातील अत्यंत प्रवित्र मानले जाणारे तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे असंख्य पर्यटक असंख्य भाविक दरवर्षी भेट देत असतात महाराष्ट्राच्या भाग्यविधात्या नद्यांचा उगमपण याच ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे जी प्रमुख पवित्र मंदिरे आपण या लेखांमध्ये अभ्यासणार आहे त्यांचा उगम स्थान किंवा त्यांची रचना याच ठिकाणी झालेले आहे याचा संपूर्ण अभ्यास आपण या लेखांमध्ये करणार आहे.
क्षेत्र महाबळेश्वर मधील काही प्रमुख मंदिरे आपण या लेखांमध्ये अभ्यासणार आहे आपणा सर्वांना माहीतच आहे क्षेत्र महाबळेश्वर मध्ये मूळ पाच मंदिरांचा समूह आहे त्यामध्ये श्री महाबळेश्वर श्री अतिबळेश्वर श्री कोटेश्वर पंचगंगा आणि कृष्णमाई मंदिर ही पाच मंदिरे क्षेत्र महाबळेश्वर मध्ये आपणास बघण्यास मिळतात या मंदिरांचे खूप अनन्य महत्व महाराष्ट्र मध्ये आहे त्याचप्रमाणे या मंदिरांचा इतिहास खूप रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे तर चला आपण तोच इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.
![]() |
| panchganga temple |
- श्री पंचगंगा मंदिर
श्री क्षेत्र महाबळेश्वर प्रसिद्ध आहे ते येथील उगम पावणाऱ्या नद्यांमुळे ज्या ठिकाणी या नद्या उगम पावतात त्यास पंचगंगा मंदिर म्हटले जाते वास्तविक येथे पाच नद्या असून सात नद्या उगम पावतात पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे पाच दगडी कमानी मधून कृष्णा वेण्णा कोयना गायत्री आणि सावित्री या नद्या उगम पावतात डाव्या बाजूस अजून एक कमान असून त्यातून भागीरथी नदीचा उगम झालेला आहे ही नदी 12 वर्षातून एकदा वाहते तर उजव्या बाजूस कमानी मधून सरस्वती नदी उगम पावते ही नदी सात वर्षातून एकदा वाहते.
या सर्व नद्यांचे पाणी एकत्रित होऊन गोमुखातून समोर असलेल्या ब्रह्मकुंडात पडते या कुंडातील पाणी हिंदु धर्मात अतिशय पवित्र मानले जाते तसेच या कुंडात स्नान करणे अतिशय पवित्र मानले जाते सध्या येथे स्नान करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे याच कुंडाच्या पुढील बाजूस दुसरे एक कुंड आहे त्यास विष्णू कुंड म्हटले जाते चारही बाजूंनी कमी दार बांधकाम करण्यात आल्याने मंदिराचे रूप अतिशय मोहक दिसते.
- श्री महाबळेश्वर मंदिर
श्री क्षेत्र महाबळेश्वर मधील सर्वात प्रमुख मंदिर म्हणजे श्री महाबळेश्वर मंदिर श्री महादेवाने रुद्राक्ष लिंगरूपी कायमचे वास्तव्य केले सद्यस्थितीमध्ये असलेले हे मंदिर राजा सिंघण देव यानी बांधले. वेळोवेळी त्याची सातारा छत्रपती शिर्के मोरे यांनी दुरुस्ती जिर्णोद्धार केला हे मंदिर तीन विभागात आहे सुरुवातीला सभामंडप असून येथे नंदी विराजमान आहेत या सभामंडपाची रचना पाहता ती मूळ मंदिर पेक्षा वेगळी वाटते.
कदाचित ते बांधकाम नंतरच्या कालखंडात केले असावे आत मध्ये गेल्यानंतर तेच घर असून येथे श्री काळभैरवांची स्थान आहे येथे श्री महादेवांचा पलंग ठेवण्यात आला असून त्यांच्या समोरच चंद्रराव मोरे यांनी देवास अर्पण केलेला देवाचा मुखवटा आणि नाग ठेवण्यात आला आहे.
येथून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर प्रचंड मोठे स्वयंभू शिवलिंग आहे या शिवलिंगावर खळगे असून ते सतत भरलेले असतात त्यातील पाणी कधीच आटत नाही हे विशेष या पाच खळग्यास कृष्णा वेण्णा कोयना सावित्री आणि गायत्री नद्यांचे पाणी म्हणूनच संबोधले जाते येथे एक भलामोठा पुरातन नंदादीप तेवत असतो हा नंदादीप पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी श्री महाबळेश्वरास अर्पण केला होता या मंदिराच्या आवारात श्री छत्रपती महाराजांनी जिजाऊ आईसाहेबांची सुवर्ण तुला केली होती.
- श्री अतिबळेश्वर मंदिर
श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिराच्या शेजारी अतिबळेश्वर मंदिर असून हे मंदिर महाबळेश्वर मंदिरा सारखेच पण छोटे आहे. श्री विष्णूदेवाने अतिबळीचे नाव धारण करून येथे कायमचे वास्तविक केले तेच हे मंदिर श्री विष्णू देवाच्या नावे हे मंदिर असले तरी याच्या मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आपणास बघायला मिळते मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदी असून आत मध्ये सभामंडप अशी रचना या मंदिराची आहे या मंदिराच्या शेजारीच कमळजा देवीचे भव्य मंदिर आहे
- श्री कोटेश्वर मंदिर
या मंदिराची अशी आख्यायिका आहे की श्री ब्रह्मदेवांनी महाबळ आणि अतिबळ या दैत्य बंधूंच्या सैन्याचे नाव धारण करून या ठिकाणी कायमचे वास्तव्य केले. याच स्थानाला कोटेश्वरी मंदिर असे म्हटले गेले मंदिर तुलनेने अतिशय छोटे असून येथे इतर मंदिरांप्रमाणेच शिवलिंग आहे.
हे मंदिर सध्याच्या क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूच आहे येणारे भक्त भाविक पर्यटक यांना या मंदिरा विषयी फारशी माहिती नसल्याने या मंदिराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे हे मंदिर देखील इतर मंदिरांप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांनी भाविकांनी पर्यटकांनी मंदिरास अवश्य भेट द्यावी.
- कृष्णामाई मंदिर
कृष्णामाई मंदिर मुख्य गावापासून सुमारे पाचशे मीटर पूर्वेकडे कडेवर हेमाडपंती शैलीतील अतिशय सुबक आणि इतर मंदिरांपेक्षा अत्यंत वेगळे बांधकाम असलेले हे मंदिर आहे मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस कमानी दार तेवढ्या असून त्यांच्या मध्यभागी पंचगंगा मंदिर प्रमाणे गोमुख आणि कुंड आहे.
कदाचित मंदिरातून भूमिगत मार्गाने पाणी या मंदिरात येत असावे इथूनच पाणी पुढे कृष्ण नदी पूर्वेकडे वाहत जाते मुख्य गाभाऱ्यात अत्यंत आकर्षक इतर मंदिरांपेक्षा अतिशय वेगळे आणि उंच शिवलिंग असून येथील छतावर भिंतीवर अत्यंत सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे तसेच बाहेरील भिंतीवर देवतांच्या मूर्तीचे कोरीकाम कुशल पणे केलेले दिसून येते.
त्याचप्रमाणे मंदिराच्या समोरून दोन बलकवडी धरणाचा नजारा अतिशय मनमोहक दिसतो त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनास व समोरील दृश्य अनुभवण्यासाठी भेट देत असतात असे असंख्य दृश्य तुम्हाला या मंदिराच्या बाजूने दिसतात त्याचप्रमाणे सावित्री नदी याच ठिकाणाहून खाली पडताना तुम्हाला बघण्यास मिळते
कसे जावे आणि स्थानिक प्रवास (How to Reach & Local Transport):
महाबळेश्वर बस स्थानकापासून क्षेत्र महाबळेश्वरच्या अंतर 6 किलोमीटर आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर मधील मंदिरांना भेट देण्यासाठी प्रामुख्याने आपण बस सेवा तसेच टॅक्सी सेवा यांचा उपयोग करू शकतो. 'महाबळेश्वर दर्शन' नावाने महाबळेश्वर येथे बस सेवा चालू असते, त्यामध्ये तुम्ही महाबळेश्वर दर्शन पण करू शकता तसेच महाबळेश्वर मधील हीच प्रसिद्ध मंदिरे बघू शकता.
त्याचबरोबर येथे जाण्यासाठी आपण टॅक्सीचा अवलंब पण करू शकता. खूप कमी शुल्कामध्ये तुम्ही महाबळेश्वर टॅक्सी बुक करून मंदिरांना भेट देऊ शकता.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ (Best Time to Visit):
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील मंदिरांना भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे. या वेळेमध्ये तुम्ही या मंदिरांना भेट देऊ शकता.
कृष्णामाई मंदिराला भेट तुम्ही संध्याकाळी 6 पर्यंतच देऊ शकता, कारण की ते क्षेत्र गावापासून 3ते 4 किलोमीटर लांब आहे. याची आपण भेट देताना काळजी घ्यावी.
पर्यटकांसाठी काही खास टिप्स (Travel Tips):
थोडक्यात सांगायचे तर...
आपण या लेखांमध्ये श्री क्षेत्र महाबळेश्वर मधील पाच मंदिरांचा समूहाची थोडक्यात माहिती घेतलेली आहे या मंदिरांचे जसे अनन्य महत्व आहे तसेच महाबळेश्वर या ठिकाणाला ही इतिहासामध्ये खूप महत्त्व आहे महाबळेश्वर मधले अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांचे महत्त्व अजूनही कायम आहे त्याच गोष्टींचा आपण अभ्यास पुढील लेखांमध्ये करणार आहे.
खूप साऱ्या गोष्टी असे असतात की जे इतिहासामध्ये अजरामर होऊन जातात त्याच गोष्टींमध्ये काही गोष्टी आपण स्वतः अनुभवत असतो तर काही गोष्टी बघितल्यानंतर अनुभव येतो त्याच पैकी ही मंदिर आहेत शेकडो वर्ष होऊन गेली तरी सुद्धा यांचे बांधकाम असेल किंवांच स्ट्रक्चर असेल अजूनही कायम आहे याच गोष्टींवरून आपल्या पूर्वजांचा आर्किटेक्चर आपल्याला समजून येते अशाच असंख्य पोस्ट आपण या वेबसाईट वरती आणणार आहे त्यासाठी आपल्या पोस्ट अशाच वाचत रहा.
,_Source_of_Chrisna._Mahabuleshwar._(12488633084).jpg)
.jpg)